View previous topic :: View next topic |
Author |
परीस शोधणारा माणूस |
mayurnsk Moderator
Joined: 18 Jan 2007 Posts: 216 Location: Nasik, Maharashtra
|
Post: #1 Posted: Thu Jul 14, 2011 11:23 pm Post subject: परीस शोधणारा माणूस |
|
|
परीस शोधणारा माणूस
एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला....
त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचा दिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली....
पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा....
शेवटी तो माणूस म्हातारा झाला....
आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या
गळ्यातील साखळीकडे गेले...
ती साखळी सोन्याची झाली होती.....
दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे
लक्षच गेले नाही....
तात्पर्य:
प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...
कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने...
तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....
तर कधी प्रेयसीच्या नात्याने.....
कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो...
आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो......
आपण जे काही असतो किवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो .......
पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात .......
मयूरएनएसके
___________
mayurnsk |
|
Back to top |
|
|
| |
amolmails White Belt
Joined: 29 Apr 2008 Posts: 45
|
Post: #2 Posted: Fri Jul 15, 2011 8:54 am Post subject: |
|
|
wow i am from pune excellent post thanks |
|
Back to top |
|
|
mayurnsk Moderator
Joined: 18 Jan 2007 Posts: 216 Location: Nasik, Maharashtra
|
Post: #3 Posted: Sat Jul 16, 2011 3:50 pm Post subject: |
|
|
अमोलमेल्स
अरे वा छान!!!!!
मराठीत प्रतिक्रिया वाचायला जास्त आवडली असती ...... असो
आयचार्टस मध्ये तुमचे स्वागत आहे.
धन्यवाद
मयूरएनएसके
______________
mayurnsk |
|
Back to top |
|
|
|
|
You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot edit your posts in this forum You cannot delete your posts in this forum You cannot vote in polls in this forum You can attach files in this forum You can download files in this forum
|
Powered by phpBB © 2001, 2005 phpBB Group
|
|