|
View previous topic :: View next topic |
Author |
ब्राम्हण हरवला आहे |
mayurnsk Moderator
Joined: 18 Jan 2007 Posts: 216 Location: Nasik, Maharashtra
|
Post: #1 Posted: Thu Mar 22, 2012 12:36 pm Post subject: ब्राम्हण हरवला आहे |
|
|
"ब्राम्हण हरवला आहे" - लेखक - मनोज शिवराम लोंढे.
· स्थळ: एका कारखान्यात दोघे सहकारी चहा पीत गप्पा मारता मारता दोघांमध्ये वादाला सुरुवात होते.
· कांबळे: (थट्टेने हसत हसत) जोशी, तुम्ही भटांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय केलात, आणि आम्ही तो मूर्खासारखा सहन केला. आम्हाला तुम्ही अगदी गुरासारखे वागवलेत. इंग्रज आले नसते, तर आम्हाला कळलंच नसत की आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही अजून काही वर्षे अंधारात खिचपत पडलो असतो.
· जोशी: अहो कांबळे, तुमच्यावर अन्याय झाला हे खरच!! आणि इंग्रजांच्या राज्यातच हे जे चालले आहे ते चूक आहे हे विचारवंतांच्या लक्षात आले. त्यांनी समाजप्रबोधन केल. हे विचारवंत कोण होते तुम्हाला माहीत आहे का?
· कांबळे: हो!! फुले, आंबेडकर, शाहू महाराज यांनी भटांवर टीकेचे आसूड ओढले.
· जोशी: अहो कांबळे, फुले, आंबेडकर महाराष्ट्रात का झाले? उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश मध्ये का झालेनाहीत?
· कांबळे: मी नाही समजलो; तुम्हाला काय म्हणायचं आहे?
· जोशी: सांगतो. अहो महाराष्ट्रात ८०० वर्षांची संत परंपरा आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम,रामदासस्वामी ह्या सर्वांनी जातीपातीच्या कृत्रिम भिंती मोडा आणि सर्वांनी एकोप्याने, समतेने,गुण्यागोविंदाने रहा, विठ्ठलाची भक्ती करा असा संदेश दिला. ह्यातले ज्ञानेश्वर, एकनाथ व रामदासस्वामी हे ब्राम्हण होते.
· कांबळे: हे बाकी खर जोशी. महाराष्ट्रात कधीही अमानुषता नव्हती. "मानवता धर्म" हाच श्रेष्ठ धर्म मानला जात आला आहे.
· जोशी: अगदी बरोबर. ह्यात शिवाजी महाराज आणि संत मंडळी ह्याचं मोठ, "नव्हे", त्यांचंच १००% योगदान आहे. महाराजांनी सुलतानी संकटे आपल्या समर्थ बाहूंनी पेलली आणि प्रजेला सुरक्षित केले,अभय दिले.
· कांबळे: अगदी बरोबर. महाराजांनी परकीय आक्रमकापासून स्वकीय जनतेचे रक्षण केले, आणि संतांनी मानवतावाद मराठी जनतेच्या नसानसात बिंबवला.
· जोशी: क्या बात है कांबळे!! जीते रहो!!
· कांबळे: पुढे इंग्रज आले, आणि स्वतःबरोबर युरोपातील आधुनिक विचार यथे घेऊन आले. Equality, fraternity, freedom. समता, बंधुता आणि स्वराज्य.
· जोशी: काय गम्मत आहे नाही!! स्वतः भारतीयांना गुलामीत जोखाडायचे, काला कुत्ता म्हणून हिणवायचे,आणि इंग्लंडमधील समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे गोडवे गायचे. अहो कांबळे, इंग्रजांनी आपल्याला लुटलं, नागवल हे सत्य आहे. स्वतःच राज्य सुरळीत चालावं, म्हणून भारतीय समाजातील जातीभेद व प्रांतभेद ह्या दुफळीचा त्यांनी यथेच्छ फायदा घेतला. स्वतःच्या फायद्यासाठी येथील जातीभेदावर वारंवार टीका करू लागले. ब्राम्हणांना झोडपू लागले. कारण अगदी Alexander च्या काळापासून परकीयांनी ओळखले होते की ब्राम्हणांना वेगळे पाडले, त्यांना झोडपले की भारतावर बिनदिक्कत राज्य करता येते.
· कांबळे: पण इंग्रजांच्या काळातील टीकेमुळेच आपल्या समाजात समता येऊ लागली.
· जोशी: हे अर्धसत्य आहे. इंग्रजामुळे समता आली हे खोटे. पण त्याकाळातील आपल्या विचारवंतांनी इंग्रजी विचार वाचले, इंग्रजी शिक्षण घेतले आणि त्यांनी भारतीय समाज-व्यवस्थेवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. हे विचारवंत कोण होते ठाऊक आहे तुम्हाला?
· कांबळे: फुले, आंबेडकर, शाहू महाराज दुसर कोण?
· जोशी: (हसून बघत) अहो कांबळे; फुले आंबेडकर ह्यांच्या अगोदर लोकहितवादी देशमुख,आगरकर, रानडे, रेवेरंड टिळक ह्यांनी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला.आंबेडकरांच्या बरोबरीने, सावरकरही जातीवादावर प्रखर आसूड ओढत असत. सावरकरांनी स्पष्ट सांगितले,की जातीवाद हा हिंदूधर्माला लागलेला काळा डाग आहे. आणि तो पुसण्याकरता, आपापसात रोटीबेटी व्यवहार झाला पाहिजे. सावरकरांनी दलितांबरोबर सहभोजने केली होती, त्यांना मंदीर प्रवेश मिळवून दिला होता.
· कांबळे: बरोबर आहे जोशी, सावरकरांनी देशाकरता, समाजाकरता खूप केले. आणि त्यांना बदनाम केले गेले, आणि अजून केले जाते.
· जोशी: आता मी तुम्हाला एक थेट प्रश्न विचारतो. मी तुमच्याबरोबर ८ - ९ वर्ष काम करतो आहे;तुमच्याबरोबर जेवतो, हास्यविनोद करतो. मी तुमच्यावर कधी अन्याय केला? अन्याय सोडा, दुजाभाव केला का?
· कांबळे: नाही, कधीच नाही. आपण दोघे अत्यंत चांगले मित्र आहोत. आपण अडीअडचणीच्यावेळी एकमेकांना मदत करतो. पण जोशी आता आमच्यावर कोणी अन्याय करूच शकणार नाही. आमच्यापाठी कायदा खंबीरपणे उभा आहे.
· जोशी: बरोबर. धरून चाला, की माझ्या मनात खर तर तुमच्यावर अन्याय करायचा आहे, पण तुमच्या मागील कायद्याच्या पाठबळामुळे, घाबरून, मी तुमच्यावर अन्याय करत नाही आहे. कांबळे, तुमच्या वडिलांवर कोणा ब्राम्हणाने अन्याय केला का?
· कांबळे: नाही. उलट त्यांचे सर्व चांगले शिक्षक आणि चांगले मित्र भटच होते. आणि म्हणूनच माझे वडील शिकून मोठे वकील झाले.
· जोशी: अजून एक प्रश्न. तुमच्या आजोबांवर कोणी ब्राम्हणांनी अत्याचार केला का?
· कांबळे: नाही जोशी. माझे आजोबा म्हणत की, भट म्हणजे देव मानस. भट चांगले संस्कार करतात. चांगले काय वाईट काय ते शिकवतात.
· जोशी: अहो कांबळे, मग तुम्ही स्वतःच्या वडिलांवर व आजोबांवर अविश्वास दाखवून, स्वार्थी, फसव्या अशा राजकीय पुढार्यांवर विश्वास ठेऊन, ब्राम्हणांनी अन्याय केला, असा खोटानाटा ओरडा का करता?
· कांबळे: अहो जोशी, अजून खैरलांजीसारखी प्रकरणे होतातच ना? दलितांवर अत्याचार अजून होताच आहेतना?
· जोशी: खैरलांजीचा अत्याचार करणाऱ्यात ब्राम्हण होते का? जरा नाव आठवा बरं? गोखले होते कां? फडके होते कां? मराठे होते कां? देशपांडे होते कां? जोशी होते कां? अभ्यंकर होते कां? एकही नव्हता. हे मी नाही सांगत, सरकारी पुरावे बोलत आहेत. अधिक माहिती करता आपण श्री. उज्वल निकमांकडे पण जाऊ म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ किंवा बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर ताबडतोब होऊन जाईल.
· कांबळे: (अचंबित झाले आहेत) जोशी बरोबर बोलता आहात तुम्ही.
· जोशी: हल्ली काय झालं आहे, कोणीही उठावे, आणि ब्राम्हणाच्या टपलीत मारून जावे अशी परिस्थिती आहे. कारण ब्राम्हण कुणाच्या अध्यात ना मध्यात. काहीच बोलत नाही. आपल्याच कोषात निपचित पडलाय. आपण बर; आपल कुटुंब बर आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बरे.
· कांबळे: अहो, म्हणजेच भट स्वकेंद्री झालाय; कुठे आग लागली काय किंवा वणवा पेटला काय. भटाला त्याचे सोयर - सूतक नसते. भट आणि त्याच कुटुंब. अगदी संदीप खरे म्हणतात तसा, "भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत".
· जोशी: ब्राम्हण असे का झाले ह्याचा विचार केलात तर तुम्हाला त्याची कारणे लक्षात येतील. स्वातंत्र्यसंग्रामात कोण अग्रेसर होते हो? महाराष्ट्रापुरत बोलायचं झाल्यास!!
· कांबळे: वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधु, सावरकर, कान्हेरे, गोखले, आगरकर, एस एम जोशी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन.
· जोशी: बस! बस! एव्हढी नावे पुरे आहेत. ही सर्व मंडळी जातीने कोण होती? हे सगळे ब्राम्हण होते. ह्या लोकांनी स्वतःच्या कुटुंबाची, संसाराची होळी केली, जेणेकरून समस्त भारतीयांना दिवाळी साजरी करता येईल. त्यांच्या बलिदानामुळे देश स्वतंत्र झाला.
· कांबळे: (पुन्हा निःशब्द, डोळ्यात पाणी) पण जोशी, गांधीजींना गोडसेने मारले. तोही भटच होता.
· जोशी: गोडसेने गांधीहत्या केली. त्यानंतर गावोगावी ब्राम्हणांची घर जाळली गेली, सावरकरांच्या लहान भावाची, दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. एका माणसाच्या चूकीने हजारो ब्राम्हणांचे निःस्वार्थी बलिदान फोल ठरले. आणि मग पेशवाईला बदनाम करण्याची चढाओढ लागली.
· कांबळे: पण रघुनाथराव आणि दुसऱ्या बाजीरावाने पेशवाई, आणि पर्यायाने मराठ्यांचं राज्य बुडवलच ना?
· जोशी: हा एक “typical dialogue” आहे. अरे पण त्या आधी बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव,विश्वासराव, नानासाहेब, माधवराव, ह्यांनी स्वतः छत्रपती न होता, छत्रपतींचे पंतप्रधान म्हणून पांच पिढ्या इमाने - इतबारे कारभार केलाच ना? आणि रघुनाथरावांनीसुद्धा अटकेपार म्हणजे अफगाणिस्थानपर्यंत आपली मराठी सत्ता नेली. पहिल्या बाजीरावाचे युद्धातील डावपेच अमेरिकेत कॉलेजमध्ये शिकवले जातात, आणि महाराष्ट्रात त्या महान अजिंक्य योद्ध्याला बदफैली म्हणून हिणवले जाते. महाराजांना ब्राम्हण देवासारखे पूजतात. पण पेशव्यांचा मात्र कोणी आदर करत नाही. उलटपक्षी त्यांना बदनाम केले जाते.
· कांबळे: (अचंबित झाले आहेत) भट एव्हढे पराक्रमी, निःस्वार्थी होते, तर ते आता समाजकारणात,राजकारणात का येत नाहीत.
· जोशी: ब्राम्हण समाजकारणातून बाहेर नाही. हां तो राजकारणातून निश्चित बाहेर पडला आहे. ह्याला कारण, आमच्यावरील राजकीय बहिष्कार म्हणा, किंवा ब्राम्हण स्वतः कोषात गेला म्हणा. ब्राम्हणांनी विचार केला, की देशासाठी एव्हढा स्वार्थत्याग, बलिदान करून पदरी काय पडल? अवहेलना? तिरस्कार?त्यापेक्षा आपण बर, आपल कुटुंब बर. मरू दे, समाज, देश गेला खड्ड्यात
· कांबळे: ओहो!! मला हे कधी जाणवलच नाही. मी नेहेमी भटांच्या आपण बर आपल कुटुंब बर ह्या वृत्तीला शिव्या घालत आलो आहे. पण ह्या वृत्तीमागील कारण काय ते आज तुमच्याकडून कळल्यावर मला भटांबद्दल आदर वाटू लागला आहे. पण जोशी, ही वृत्ती किंवा निवृत्ती म्हणा पाहिजे तर त्याला,चुकीची नाही वाटत तुम्हाला. भटांनी, त्यांना लोकांनी काही बोलल तरी, समाजाला चांगल मार्गदर्शन करण्याचा म्हणजेच थोडक्यात नेतृत्वाचा त्याग करून, महाराष्ट्राचं व पर्यायाने देशाच नुकसान केल आहे असेच म्हणावे लागेल. कारण निःस्वार्थी, चांगले लोक राजकारणापासून दूर राहिले आणि स्वार्थी,पुढाऱ्यांची अनिर्बंध सत्ता सुरु झाली. हे देशाला, समाजाला घातक आहे. निःस्वार्थी, पापभिरू, पुण्यवान माणसांनी राजकारणात, समाजकारणात यायलाच हवे.
· जोशी: अहो कांबळेसाहेब, आज इतकी वाईट परिस्थिती आहे, २६/११ नंतर लोकांच्या सुरक्षिततेबद्दल विचार न करता महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी त्यांच्या पाळलेल्या लोकांकरवी ब्राम्हण ब्राम्हणेतर वाद उकरला. बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्यासारख्या थोर इतिहास अभ्यासकाच्या शिवाजी महाराजांवरील भक्तीवर त्यांनी लांच्छन उडवली. दादोजी कोंडदेव हे महाराजांचे प्रशिक्षक नव्हते असा जावई-शोध लावून दादोजींचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून ह्यांनी काढले. ह्यांच्या दृष्टीने, समर्थ रामदासस्वामी आणि महाराज एकमेकांना कधी भेटलेच नाहीत. त्यामुळे, रामदासस्वामी हे महाराजांचे राजकीय व आध्यात्मिक गुरु नव्हतेच मुळी. वाह वाह!! किती किती शोध लावले काही मर्यादाच ठेवली नाही. अहो एवढेच कशाला, त्या बिचार्या नितीन रामचंद्र नी सुंदर केलेली मराठीतील शिवाजीवरची मराठी सिरियल सुद्धा दिल्लीत बसून महाराष्ट्राचे नेते म्हणवर्यांनी बंद केली.
· कांबळे: अहो जोशी, पण तुकोबांनीच महाराजांना रामदास स्वामींकडे पाठवले होते. तुकाराम महाराजांनी शिवाजीराजांना सांगितले की, “राजकारण माझी प्रवृत्ती नाही. सुलतानी आक्रमणापासून रयतेचे रक्षण करून स्वराज्य स्थापन करायचे असल्यास गुरु म्हणून समर्थ रामदासच योग्य आहेत. त्यामुळे राजे तुम्ही त्यांच्याकडे जा” असा योग्य सल्ला दिला होता.
· जोशी : पण ज्यांना २६/११ पासून लोकांचे लक्ष्य हटवायचे होते, त्यांना अशा जाती भेदासारख्याच गोष्टी सुचणार दुसर काय
· कांबळे: पण भटांनी ह्यावर कुठेच आवाज उठवला नाही.
· जोशी: ब्राम्हणांनी "मौनं खलु साधनं" हे व्रत घेतलं आहे अस समजा हव तर.
· कांबळे: अहो, पण हे घातक आहे. चूकीचा किंवा सोयीचा इतिहास मुलांना शिकवण हे पाप आहे.
· जोशी: हल्ली पाप - पुण्य, खर - खोट अस काही राहील आहे अस वाटत तुम्हाला? गुंड बदमाश आमचे पुढारी होतात. आम्ही त्यांना निमूटपणे स्वीकारतो. यथा राजा तथा प्रजा.
· कांबळे: नाही जोशी, भटांनी समाजकारणात व राजकारणात परतायला हव. ही राजकारणात पसरलेली घाण दूर करायला हवी. निःस्वार्थी, शिकलेले सवरलेले लोक राजकारणात यायला हवेत तरच समाज ह्यातून वाचेल आणि देशाच कल्याण होईल.
· जोशी: चला तुम्हाला माझे विचार पटले, बर वाटल. सत्याची बाजू मी व्यवस्थित मांडली. आता ब्राम्हणांनी समाजकारणात, राजकारणात उतरून आज पसरलेली घाण साफ कारण आवश्यक आहे, ती काळाची गरज आहे. ती जबाबदारी ब्राम्हण स्वीकारतील अशी मला अशा वाटते. स्वतःवरील अन्यायाच्याविरोधात बोलतील व स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर येतील असा विश्वास वाटतो आहे. आणि बर ककांबळे,तुम्ही तुमच्या मित्र परिवारा या जळजळीत सत्याची माहिती द्या आणि मगं त्यांना ही निर्णय घेऊ दे कोण खरा आहे आणि कोण खोटा ते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सत्य हे पाण्यासारखे नितळ आणि स्वच्छ असते. अनेक लोक त्या पाण्याला गढूळ करण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी घाण ही पाण्याच्या तळाशी जाऊनच पोचते एवढे शास्त्रीय कारण जर सर्व जाती धर्मातल्या लोकांनी ओळखले तर महाराष्ट्राचा विकास दामदुपटीने व्हायला वेळ लागणार नाही. सध्याचे व पूर्वीच्या नतद्रष्ट राजकीय पुढार्यांच्या मुळे आपला महाराष्ट्र 25 वर्षे मागे गेला आहे याची शरम सुद्धा वाटत नाही. नुसते आपले 10बोटांत 10 सोन्याच्या अंगठया, पाश्वभागाखाली महिद्रची स्कॉरपियो, गळ्यात बायका घालतांत तसे मणभर साखळ्या सारख्या सोन्याच्या चेना, गुजराथमध्ये बायकांचे दल्ले जसे पांढरे कपडे घालतात तसे कपडे घालायचे आणि दिवसभर बोंबलत फिरयाचे. फिरून कंटाळा आला की मांसाहारीवर ताव, संध्याकाळी ढोस ढोस ढोसायची आणि नतंर चौफुला किंवा तत्सम ठिकाणी जाउन तमाशा. अरे हे काही जगणे आहे कां?
Following is original link for the article & to reach to original writer.
http://manojlondhe.blogspot.in/2011/05/blog-post.html
_______________
mayurnsk
Last edited by mayurnsk on Thu Mar 22, 2012 1:55 pm; edited 2 times in total |
|
Back to top |
|
|
| |
sairanga19 White Belt
Joined: 28 Nov 2009 Posts: 51
|
Post: #2 Posted: Thu Mar 22, 2012 12:57 pm Post subject: |
|
|
mayurji whats the meaning in english |
|
Back to top |
|
|
bolband_macd White Belt
Joined: 06 Sep 2011 Posts: 104
|
Post: #3 Posted: Thu Mar 22, 2012 4:14 pm Post subject: Re: ब्राम्हण हरवला आहे |
|
|
Mayur bhaoo,
Atishay bochra vishay.. pan khoop effective maandni aahe. Pan he nuste waachun chalnaar nahi. Pratyakshaat ananne ani pasarawne jaroori aahe.
Thanks for sharing,
BM
mayurnsk wrote: | "ब्राम्हण हरवला आहे" - लेखक - मनोज शिवराम लोंढे.

mayurnsk |
|
|
Back to top |
|
|
mayurnsk Moderator
Joined: 18 Jan 2007 Posts: 216 Location: Nasik, Maharashtra
|
Post: #4 Posted: Thu Mar 22, 2012 4:56 pm Post subject: |
|
|
bolband_macd
khare tar mala hya vishayavar jastit jasta pratikriya apekshit hotya.
mayurnsk |
|
Back to top |
|
|
matrixvipin White Belt
Joined: 15 May 2009 Posts: 12
|
Post: #5 Posted: Wed Feb 19, 2014 1:51 pm Post subject: |
|
|
mayur bhau ekdum mast lekh aahe.
Dhanyavad share karnya sathi. |
|
Back to top |
|
|
|
|
You cannot post new topics in this forum You cannot reply to topics in this forum You cannot edit your posts in this forum You cannot delete your posts in this forum You cannot vote in polls in this forum You can attach files in this forum You can download files in this forum
|
Powered by phpBB © 2001, 2005 phpBB Group
|
|
|